रितेश देशमुख होस्ट करत असलेला Bigg Boss Marathi 6 हा शो सुरू होण्यासाठी अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी या कार्यक्रमामध्ये कोण कोण झळकणार याविषयी अंदाज बांधला जातो आहे. आता कलर्स मराठी वाहिनी आणि ' बिग बॉस मराठी 'च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरुन या स्पर्धकांचे प्रोमो शेअर करण्यात आले असून, त्यानंतर या स्पर्धकांच्या नावावरुन पडदा हटायला सुरुवात झाली आहे
'बिग बॉस मराठी 6'च्या स्पर्धकाबाबत कलर्स मराठीच्या अधिकृत पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओवर असे कॅप्शन देण्यात आले की, 'सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातवरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल...' ग्रँड प्रीमियर सोहळ्यात ही हसीना बोल्डनेसचा तडका देणार आहे, तिच्या सादरीकरणाची झलक या प्रोमोत पाहायला मिळाली.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये बोल्ड अंदाजात एक सौंदर्यवती येते. सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन ही अभिनेत्रीच्या येण्याने स्टेजवर अक्षरशः माहोल बदलला आहे. तिचा धमाकेदार डान्स पाहताना चाहत्यांना तिच्या दंडावर आणि कमरेवर टॅटू असल्याचं पाहायला मिळालं. या टॅटूमुळे ही सुपर मॉडेल सोनाली राऊत असल्याचं प्रेक्षकांनी आधीच ओळखलं आहे. या प्रोमोवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. यात जवळपास अनेकांनी ही सोनाली राऊत असल्याचं म्हटलंय.
कोण आहे सोनाली राऊत?
सोनाली राऊत ही प्रसिद्ध मॉडल आणि अभिनेत्री आहे. रणवीर सिंगसोबत 2011 मध्ये एका मासिकासाठी हॉट अंदाजात एक फोटोशूट केल्यामुळे ती रातोरात लोकप्रिय झाली होती. हिंदी बिग बॉसच्या आठव्या सीजनमध्येही ती दिसली होती. या सीजन मुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती टॉप फाईव्ह मध्ये पोहोचली आणि तयारी न करता तिचा रोजच्या कपड्यांमध्ये ती स्टेजवर आली. तिची ही शैली प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. बिग बॉसच्या घरात झालेल्या नॉमिनेशन मध्ये तिला अचानक बाहेर काढण्यात आलं होतं. पण तिचे लोकप्रियता इतकी होती की तिला परत आणण्यात आलं.