Bigg Boss Marathi : तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप , नेमकं काय घडलं ?
Bigg Boss Marathi : तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप , नेमकं काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
बिग बॉस मराठीचा चौथा आठवडा सुरू झाला आहे. आणि या आठवड्यात घरात वादावादी झाल्याचं दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कवरुन पुन्हा एकदा घरात राडा झाल्याचं दिसत आहे. सुरुवातीला कॅप्टन्सी टास्कमध्ये रुचिता जामदार आणि करण सोनावणे यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. रुचिताने अंगाला हात लावल्याचंही करण म्हणाला होता. त्यांच्यामध्ये हाणामारीही झाली. पण, त्यानंतर मात्र रुचिता थेट राकेश बापटशी भिडली. राकेशसोबतही तिचं जोरदार भांडण झालं होतं. रुचितासोबत भांडण झाल्यानंतर राकेश बापटही चिडला होता. 

कॅप्टन्सीसाठी ‘बीबी पापड फॅक्ट्री’ हा टास्क घरातील स्पर्धकांमध्ये खेळला गेला. याच टास्कदरम्यान राकेश बापट आणि रुचिता जाधव यांच्यात मोठा वाद झाला. रुचिता टास्कदरम्यान माझ्या अंगावर धावून आली आणि तिने मला चुकीचा स्पर्श केला, असा धक्कादायक आरोप राकेशने केला आहे. इतकंच नव्हे तर रुचिता नेमकं कशी वागली, हे जेव्हा राकेश सांगत होता तेव्हा प्रायव्हसीच्या कारणास्तव काही संवाद बीप करण्यात आले.

टास्कदरम्यान रुचिताच्या वागण्यावर राकेश चांगलाच चिडला होता. रागाच्या भरात तो थेट बेडरुममध्ये निघून गेला. त्यानंतर राकेशने दिपालीला याबद्दल सांगितलं. राकेश आणि दिपाली यांच्यात झालेल्या संवादावरून रुचिताने घरात मोठा वाद घातला. अखेर दिपालीने तिला सर्वकाही राकेशसमोर बोलून वाद मिटव, असा सल्ला दिला. पण रुचिता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर विशालने यात मध्यस्थी केली आणि सगळेजण राकेशजवळ बोलायला गेले.

रुचिताबद्दल राकेशच्या मनात राग अजूनही कायम आहे. “मी टास्कदरम्यान तिला सांगत होतो की माझ्याजवळ येऊ नकोस. तरी ती माझं ऐकत नव्हती, ती तिच्या अग्रेशनमध्ये खेळत होती. मला आता या गोष्टीवर अजिबात बोलायचं नाहीये. मी जे काही बोलेन ते थेट भाऊच्या धक्क्यावर बोलेन. तिथेच याबद्दल चर्चा होईल”, असा इशारा राकेश देतो. त्यानंतर रुचिता आणि विशाल तिथून निघून जातात. हे दोघं गेल्यावर राकेश कॅमेराजवळ बघून म्हणतो, “मला विशाल आणि रुचिताचं थोबाडसुद्धा बघायचं नाही. ते दोघंही मूर्ख आहेत.”
इतर बातम्या
Join Whatsapp Group