काय सांगता ....!  'बिग बॉस मराठी ५' साठी रितेश देशमुख घेतोय
काय सांगता ....! 'बिग बॉस मराठी ५' साठी रितेश देशमुख घेतोय "इतकं" मानधन
img
Dipali Ghadwaje
‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. हिंदी भाषेतील बिग बॉसला तुफान यश मिळाल्यानंतर इतर स्थानिक भाषांमध्येही हा शो सुरू झाला.‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यानंतर आता बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच सुरु झाला आला आहे. बिग बॉसच्या घरात मजा, मस्तीसह भांडण, वाद आणि गॉसिप होताना दिसत आहे. यंदाच्या शोचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत नसून सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख करत आहे. प्रेक्षकांची रितेशच्या सूत्रसंचालनाला पसंती मिळत आहे. दरम्यान आता रितेशने या शोसाठी घेतलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. 

फिल्मीबीटने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठी ४ शोच्या सूत्रसंचालनासाठी महेश मांजरेकर प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेत होते. आता रितेश प्रत्येक भागासाठी २५ लाखांपेक्षा जास्त मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे. तो प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे ३० ते ४० लाख रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याचे एकूण मानधन दोन ते अडीच कोटींच्या जवळपास आहे. तर रितेश एका सिनेमासाठी सुमारे ७ ते ८ कोटी रुपये घेतो.  

'बिग बॉस मराठी'चा पाचव्या सीझनचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. तसेच सदस्य नेहमीच एकमेकांबद्दल गॉसिप करताना दिसून येतात. कधी कोण कोणाच्या बाजूने बोलेल आणि कधी कोण कोणाच्या विरोधात बोलेल हे सांगू शकत नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group