बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु असून हा सिझन जोरदार रंगल्याचे दिसतेय . यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक हटके स्पर्धक घरात आले आहेत आणि कल्ला करत आहेत. घरातील सदस्य ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचताना दिसता आहेत तर ,रितेश देशमुखही अगदी चोखपणे सुत्रसंचालन पार पाडताना दिसत आहे. जसजसे शो पुढे जात आहे तसतसे स्पर्धकांना खरे रंग समोर येत आहेत. आज 18 वा दिवस आहे. या आठवड्यात घरातील सदस्यांवर नॉमिनेशची टांगती तलवार आहे.
कालच्या भागात नॉमिनेशन ही प्रक्रिया पार पडली. यात काही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान , ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात अरबाजने निक्कीला सेव्ह केलं. अभिजीतने पॅडीला सेव्ह केलं. या नॉमिनेशन कार्यात टीम A विजयी झाली. कालच्या भागात वैभवने घन:श्यामला सेफ करुन अभिजीतला नॉमिनेट केल्याचं निक्की, अरबाज आणि जान्हवीला पटलेलं नाही.
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की वैभवला म्हणत आहे,“तू खूप चुकीचा निर्णय घेत आहेस. तू आर्यासोबत भांडतोस..तुला तिला नॉमिनेट करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती”. पुढे निक्की वैभवला म्हणते,“वैभवला नाही जमत गेम खेळायला”.