UIDAI ने मुलांसाठी आधार कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. जर असं केलं नाही तर मुलाच्या आधार कार्डचा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो. ही माहिती एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) 'बायोमेट्रिक्सचे अनिवार्य अपडेट' (MBU) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलांच्या आधारमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे.
आधार कार्डमध्ये नवीन अपडेट
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मुलांच्या आधार कार्डबाबत एक नवीन अपडेट जारी केली आहे. या अपडेटनुसार ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आधार कार्ड मिळालेल्या मुलांना ७ वर्षांचे झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलंय. आता ७ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक्स अपडेट करणं आवश्यक आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आई-वडील किंवा कायदेशीर पालक त्यांच्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन मुलांचं बायोमेट्रिक्स अपडेट करू शकतात आणि त्यांच्या मुलांचं आधार कार्ड अपडेट करू शकतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या मुलाचं आधार कार्ड ५ वर्षांच्या वयात बनवलं गेलं असेल आणि आता त्यानं ७ वर्षांचं वय पूर्ण केलं असेल, तर आता त्या मुलाच्या आधार कार्डमधील बायोमेट्रिक्स अपडेट करणं बंधनकारक आहे.