आधार कार्ड अपडेट करणं महागलं , शुल्कामध्ये किती वाढ झाली ? वाचा
आधार कार्ड अपडेट करणं महागलं , शुल्कामध्ये किती वाढ झाली ? वाचा
img
दैनिक भ्रमर
आपली ओळख आता आधारकार्डशिवाय पूर्ण होत नाही. त्यातही आधारकार्ड अपडेट असणं आवश्यक असते. हे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क  मोजावे लागते, आता या शुल्कात वाढ झाली आहे.  १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत ही नवी शुल्कवाढ लागू राहील. त्यानंतर नवीन रेट चार्ट हा १ ऑक्टोबर २०२८ ते ३० सप्टेंबर २०३१ पर्यंत लागू राहील.


UIDAI म्हणजे आधार कार्डासाठी ५० रुपये ते १०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जायचे. त्यानंतर शुल्कवाढ ७५ रुपये ते १२५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवी शुल्कवाढ २०२८ पर्यंत लागू राहील.UIDAIने काही वयोगटासाठी शुल्कात सवलत दिली आहे. 

५ ते ७ आणि १५ ते १७ वयोगटातील लहान मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट पहिल्यांदा मोफत असेल. तसेच ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बायोमेट्रिक अपडेट शुल्क माफ करण्यात आलं आहेत. या वयोगटाच्या व्यतिरिक्त बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी १२५ रुपये शुल्क (२०२५-२०२८) आकारले जाईल. तर पुढील कालावधित १५० रुपये शुल्क (२०२५ ते २०३१) आकारले जाईल.

५० रुपयांमध्ये मिळणाऱ्या सेवांचे दर आता ७५ रुपये इतके करण्यात आले आहेत. यात नाव, पत्ता,मोबाईल क्रमांक, जन्मतारीख या सेवांचा समावेश आहे. बायोमेट्रिक अपडेटची किंमत आधी १०० रुपये होती. आता त्या सेवेचं शुल्क १२५ रुपये इतकं करण्यात आलं आहे. ही शुल्कवाढ २०२५ ते २०२८ पर्यंत लागू राहील. परंतु २०२८ सालानंतर सेवाशुल्कात आणखी वाढ होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group