जिवंत माणूस जिवंत आहे हे दाखवण्यासाठी हे देखील सध्याच्या काळात कागदपत्रांची आवश्यकता लागते. त्यामुळे कागदपत्रे किती महत्त्वाची आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांना तर पर्यायच नाही. या दोन्हींशिवाय कोणतेही आर्थिक काम पूर्ण करणे शक्य नाही. हे लक्षात घेता सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. अजूनही अनेक लोकांनी त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नाही. अशा लोकांचे पॅन कार्ड देखील निष्क्रिय झाले आहे.
प्राप्तिकर विभागाने घालून दिलेल्या नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नावावर फक्त एकच पॅन कार्ड जारी करण्याची परवानगी आहे. ते इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर आयकर विभाग आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२ ब अंतर्गत एकापेक्षा जास्त पॅन कार्ड धारण करणाऱ्या व्यक्तीला १०,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर लिंकवर क्लिक करावा लागेल. यानंतर तुम्हाला येथे सेवाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला लिंक आधारचा पर्याय दिसेल. यानंतर तुम्ही Know About Aadhar Pan Linking Status या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही तुमचा पॅन आणि आधार तपशील भरा. यानंतर View Link Aadhar Status वर क्लिक करा. यानंतर आधार बटणावर क्लिक करा आणि अशा प्रकारे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.