पॅन कार्डबाबत महत्वाची बातमी ! 'हे' काम आताच करा, नाहीतर...
पॅन कार्डबाबत महत्वाची बातमी ! 'हे' काम आताच करा, नाहीतर...
img
वैष्णवी सांगळे
तूमच्या पॅन कार्डशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर उशीर करू नका. आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, दोन्ही कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत लिंक केली नाहीत तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर कर भरणे, बँक खाते उघडणे किंवा गुंतवणूक करणे कठीण होईल. तुमचे अनेक महत्त्वाचे आर्थिक व्यवहार थांबवले जातील.

पॅन कार्ड आज प्रत्येक व्यक्तीसाठी एक आवश्यक दस्तऐवज आहे. ते केवळ कर भरण्यासाठीच नाही तर बँक खाती उघडण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि मोठे व्यवहार करण्यासाठी देखील वापरले जाते. म्हणून ते निष्क्रिय केले तर तुमचे अनेक महत्त्वाचे आर्थिक व्यवहार थांबवले जातील.आधार पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच ३१ डिसेंबर आहे. जर तुम्ही अजूनही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुमच्याकडे अवघे काही तास उरले आहेत.

आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. तुमचे पॅन कार्ड बंद झाल्यावर तुमची अनेक कामे होणार नाहीत. तुम्हाला आयटीआर भरण्यासाठी, बँक अकाउंट उघडण्यासाठी, टॅक्ससंबंधित इतर कामे करण्यासाठी पॅन कार्ड खूप गरजेचे आहे. जर हे पॅन कार्ड बंद झाले तर खूप अडचणी येऊ शकतात.

आधार पॅन कार्ड कसं लिंक करायचं? 

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन लिंक करु शकतात.

सर्वात आधी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Aadhaar Link ऑप्शन निवडा. यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि पॅन कार्ड टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला १००० रुपयांची लेट फी भरायची आहे. यानंतर तुमचे आधार पॅन कार्ड लिंक होण्यासाठी प्रोसेस होईल.

यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल. काही दिवसांनी तुमचे आधार पॅन कार्ड लिंक होईल. याची माहिती तुम्हाला मिळेल.


PAN-Aadhaar Link स्टेटस कसा चेक करायचा? 

जर तुम्ही आधार पॅन आधीच लिंक केले असेल तर त्याचा स्टेटस चेक करु शकतात.

सर्वात आधी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर Link Aadhaar Status वर चेक करा.

यानंतर तुमचे पॅन आणि आधार नंबर टाका. तुमचे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही हे तुम्हाला समजेल.



इतर बातम्या
Join Whatsapp Group