कर्जाची चिंताच मिटली, पॅनकार्ड वर मिळेल 5 लाखांपर्यंत कर्ज
कर्जाची चिंताच मिटली, पॅनकार्ड वर मिळेल 5 लाखांपर्यंत कर्ज
img
Vaishnavi Sangale
5 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळवणे आता कठीण काम नाही. ना बँकेची रांग, ना जास्त कागदपत्रे. अट फक्त एवढीच आहे की,   तुमचा बँकिंग इतिहास म्हणजेच क्रेडिट स्कोअर खराब नसावा.  पॅन कार्ड, जे आतापर्यंत केवळ तुमची ओळख आणि इन्कम टॅक्स रिटर्नसाठी वापरले जात होते. त्याच पॅन कार्डच्या आधारे आता बँका आणि NBFC तुमची क्रेडिट हिस्ट्री तपासून कर्ज मंजूर करत आहेत. आता फक्त पॅन कार्डच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन घेता येते. 

जर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घ्यायचे असेल, तर तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 700 असणे आवश्यक आहे. स्कोअर जितका जास्त असेल, तितके कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.  व्याजदरही कमी असू शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमचा स्कोअर नक्की तपासा आणि तो 700 च्या वर ठेवण्याचा प्रयत्न करा. कर्जासाठी तुम्हाला तुमच्या निवडलेल्या कर्जदात्याच्या वेबसाइट किंवा ॲपवर जाऊन 5 लाखांची रक्कम आणि 12 ते 60 महिन्यांचा कालावधी (टेन्युअर) निवडावा लागेल.

राज्य मंत्रिमंडळात चार मंत्र्यांना डच्चू ? संजय राऊतांचा दावा , एकनाथ शिंदेंवरही 'हे' गंभीर आरोप

नाव, फोन नंबर, नोकरीचा तपशील, पगार आणि पॅन कार्डसारखी मूलभूत माहिती भरावी लागते. पॅन कार्ड नंबर टाकताच तुमची क्रेडिट रिपोर्ट आपोआप प्राप्त होते, ज्यामुळे प्रक्रिया खूप सोपी होते. पॅन कार्ड व्यतिरिक्त, आधार कार्ड, सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट आणि पासपोर्ट आकाराचा फोटो देखील अपलोड करावा लागतो. जर तुम्ही स्वयंरोजगार (सेल्फ-एम्प्लॉयड) असाल, तर ITR (इन्कम टॅक्स रिटर्न) किंवा व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे लागू शकतात. संपूर्ण केवायसी (KYC) प्रक्रिया ऑनलाइनच होते.

अनाया बांगर पुन्हा मुलगा बनणार ? चाहत्यांच्या प्रश्नांवर अखेर सोडले मौन, केले 'हे' मोठे विधान

सर्व तपशील भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, कर्जदाता तुमची माहिती पडताळेल. क्रेडिट तपासणी करेल. जर तुम्ही पात्र असाल तर कर्ज लवकर मंजूर होईल. काही प्रकरणांमध्ये हे अवघ्या काही तासांत होते. 24 ते 48 तासांत पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात. फक्त लक्षात ठेवा की ईएमआय (EMI) वेळेवर भरा, अन्यथा विलंब शुल्क आणि क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group