भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगीअसलेली अनाया बांगर नेहमीच चर्चेत असते. अनाया ही जन्माने मुलगा होती. लिंगबदलाच्या शस्त्रकिया करून ती मुलाची मुलगी झाली. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. सोशल मीडियावर तिला अनेकांनी ट्रोल केलं तर अनेकांनी तिने घेतलेल्या निर्णयाचं स्वागतही केलं. आता पुन्हा एकदा ती परत मुलगा बनणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
याबाबत आता आता तिने स्वतः च खुलासा केलाय. अनाया बांगर सोशल मीडियावर लाईव्ह येऊन चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. यादरम्यान एका चाहत्याने तिला विचारले, “तू पुन्हा मुलगी ते मुलगा होशील का?”. यावर अनायाने उत्तर दिले, “कधीच नाही”. या लाईव्हदरम्यान चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले, ज्यांची तिने उत्तम उत्तरे दिली. अनाया बांगरने अलीकडेच तिच्यावर बनवलेल्या माहितीपटाच्या रिलीजबद्दल इंस्टाग्रामवर एक मोठी घोषणा केली.
अनाया बांगरने नुकतीच ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव्ह शस्त्रक्रिया केली. घशाचे हाड मऊ करण्यासाठी श्वासनलिका शेव्ह शस्त्रक्रिया केली जाते. तर ब्रेस्ट ऑग्मेंटेशनने तिच्या या शारीरिक परिवर्तन प्रक्रियेला आणखी पुढे नेले आहे. अनाया बांगरने उचललेली ही पावले तिच्या लिंग बदलाच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तिने यापूर्वी यूकेमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि जेंडर-अफर्मिंग शस्त्रक्रियेद्वारे तिचे लिंग बदलले होते.