पिंपरी चिंचवड शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनेरी नगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. श्याम जंगू वाघेला वय 56 वर्ष यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नी राजश्री शाम वाघेला वय 48 वर्ष यांचा मृतदेह घरात संशयितरित्या आढळला आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
श्याम यांनी राजश्रीच्या चारित्र्यसंश्यावरून तिचा खून करून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी वाघेला यांच्याबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता दोघांमध्ये खटके उडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. श्याम पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणेही होत होती. त्यामधून श्याम याने पत्नीचा खून केला असेल, त्यानंतर गळफास घेत आयुष्याचा दोर कापला असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.