".... नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारू" ; १७ वर्षीय मुलीला धमकी ; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
img
Dipali Ghadwaje
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील अंबापूर गावात घडली आहे. केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे,

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , गावातील टवाळखोरांनी "माझ्याशी फोन वर बोल" असा सतत दबाव टाकल्याने कंटाळलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. या तरुणीला "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला ठार मारू" अशी धमकी पीडितेला देण्यात आली.

या प्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून अद्यापही एक आरोपी फरार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून गावातील काही टवाळखोर पीडित युवतीला फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकत धमकी देत होते. आरोपींनी 'तू आमच्याशी फोनवर बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारू,' अशी धमकी देत पीडित मुलीच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने दोन दिवसा पूर्वी आत्महत्या केली. 

आत्महत्येनंतर पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group