सोशल मीडिया जितकं चांगलं तितकंच वाईट. सोशल मीडियामुळे अनेक चुकीच्या गोष्टी समोर आल्या. पण असे होत असताना फक्त प्रसिद्ध होण्यासाठी काहींनी सोशल मीडियाचा चुकीचा वापर केला आहे किंबहुना करत आहे. सोशल मीडियावर असलेली प्रत्येक गोष्ट खरी असेलच असे नाही , त्याची शाशवती करणे आवश्यक ठरते. केरळमधील एक घटना तुम्हांलाही हादरवून सोडेल.
केरळमधील कोझिकोड येथील एका कापड गिरणी कामगाराने सोशल मीडियावरील द्वेष आणि मानहानीला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. फक्त २६ सेकंदाचा व्हिडीओ यासाठी कारणीभूत ठरला आहे. ही घटना आहे १६ जानेवारीची. १६ जानेवारी रोजी सिमजिथा मुस्तफा नावाच्या एका महिला इन्फ्लुएंसरने बसमध्ये प्रवास करताना एक सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात तिने आरोप केला की, शेजारी उभे असलेले दीपक यू हे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि तो व्हिडीओ वेगात पसरला.
१६ जानेवारी रोजी सिमजिथा मुस्तफा नावाच्या एका महिला इन्फ्लुएंसरने बसमध्ये प्रवास करताना एक २६ सेकंदांचा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तिने आरोप केला की, शेजारी उभे असलेले दीपक यू हे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आणि तो वेगात पसरला.
व्हिडीओ आला पण कुठलीही चौकशी न करता व्हिडिओची पडताळणी न करता नेटकऱ्यांनी दीपक यांना 'नराधम' ठरवून त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.दीपक यांनी हे आरोप फेटाळून लावले खरे पण सोशल मीडियावरील या 'डिजिटल शिक्षे'मुळे ते मानसिक तणावात गेले. लोकांच्या सततच्या टोमण्यांना आणि ऑनलाईन छळाला कंटाळून दीपक यांनी १८ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या निधनानंतर आता हे प्रकरण सोशल मीडिया ट्रायलच्या धोक्यांवर एका नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.मुळातच बसमध्ये जास्त गर्दी होती. त्यामुळे लागलेला धक्का चुकून होता की खरंच स्पर्श केला याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहेच.
दीपक यांच्या कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी असा दावा केला आहे की, दीपक निर्दोष होते. गर्दीच्या बसमध्ये लागलेल्या धक्क्यांमुळे झालेला स्पर्श हा 'विनयभंग' म्हणून दाखवला गेला. पोलिसांनी सध्या या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, त्या व्हायरल व्हिडिओची आणि दीपक यांच्यावर झालेल्या सायबर बुलिंगची चौकशी सुरू केली आहे.