धक्कादायक ! नाशिक शहरात विविध ठिकाणी तिघांची गळफास घेऊन आत्महत्या
धक्कादायक ! नाशिक शहरात विविध ठिकाणी तिघांची गळफास घेऊन आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये तीन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. आत्महत्येचा पहिला प्रकार अशोकनगर येथे घडला. सचिन पंडित जाधव (वय 35, रा. वास्तूनगर, अशोकनगर, सातपूर) या तरुणाने राहत्या घरी बेडरूममध्ये असलेल्या सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरुणाला खाली उतरवले. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार डिंगे करीत आहेत.

पावसाचं थैमान ! ६ गावांना पुराचा वेढा ; १०० हून अधिक लोक अडकले

आत्महत्येचा दुसरा प्रकार प्रबुद्धनगर येथे घडला. सुनील गोटीराम धोत्रे (वय 38, रा. महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) याने राहत्या घरी सिलिंगला असलेल्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब त्यांचे भाऊ किसन धोत्रे यांनी सातपूर पोलीस ठाण्याला कळवली. यानंतर सुनील धोत्रे यांचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे करीत आहेत.

नांदगाव : पिनाकेश्वर घाटात पुन्हा अपघात : ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत कोसळली, २ ठार तर १३ भाविक जखमी

आत्महत्येचा तिसरा प्रकार हनुमानवाडी येथे घडला. शंतनू पुंडलिक धूर्जड (वय 26, रा. दळवी अपार्टमेंट, हनुमानवाडी, पंचवटी) याने राहत्या घराच्या हॉलमध्ये छताच्या लोखंडी हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group