खळबळजनक ! ‘कॉन्फिडंट ग्रुप’चे अध्यक्ष सी.जे. रॉय यांची आत्महत्या; आयकर विभागाचे अधिकारी कार्यालयात असताना स्वतःवर झाडली गोळी
खळबळजनक ! ‘कॉन्फिडंट ग्रुप’चे अध्यक्ष सी.जे. रॉय यांची आत्महत्या; आयकर विभागाचे अधिकारी कार्यालयात असताना स्वतःवर झाडली गोळी
img
वैष्णवी सांगळे
बंगळुरूचे प्रसिद्ध उद्योजक आणि 'कॉन्फिडेंट ग्रुप'चे संस्थापक चेअरमन सीजे रॉय यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून इन्कम टॅक्स विभागाकडून रॉय यांच्यावर कारवाई सुरू होती. ठिकठिकाणी इन्कम टॅक्स विभागाने छापे मारले होते. त्यामुळे या तणावातून रॉय यांनी ऑफिसच्या केबिनमध्ये जाऊन स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, इन्कम टॅक्स विभागाची टीम ऑफिसमध्ये चौकशी करत होती, त्यावेळी ही घटना घडली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

सी.जे. रॉय यांनी २००६ मध्ये बंगळुरू इथं 'कॉन्फिडेंट ग्रुप'ची स्थापना केली होती. रॉय यांची ही कंपनी रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अत्यंत सक्रिय होती. फक्त बिझनेसच नाहीतर मनोरंजन क्षेत्रातही काम करत होती.  त्यांनी एकूण आठ कन्नड आणि मल्याळम चित्रपटांची निर्मिती केली आणि दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील अनेक प्रमुख कलाकारांसह मेगा-बजेट चित्रपटांना पाठिंबा दिला आहे. रॉय यांनी 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहनलालच्या उच्च-बजेट अॅक्शन थ्रिलर 'कॅसानोवा'ची निर्मिती केली. त्यावेळी, तो मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर त्यांनी मोहनलाल आणि प्रियदर्शन यांच्या बहुभाषिक चित्रपट मरक्करची सह-निर्मिती केली, ज्याचं बजेट सुमारे 100 कोटी होतं.

कॉन्फिडंट ग्रुपनं गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपट आणि मनोरंजन प्रकल्पांचे प्रायोजकत्व केलं आहे. मोहनलाल यांनी आयोजित केलेल्या मल्याळम टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस मल्याळम'च्या अनेक सीझनचे हे टायटल स्पॉन्सर होते. अशाप्रकारे, सीजे रॉय यांचा सहभाग केवळ चित्रपट निर्मितीपुरता मर्यादित नव्हता; तर ते अनेक पातळ्यांवर मनोरंजन उद्योगातही सहभागी होते.

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने डिसेंबर २०२५ पासून रॉय यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली होती. मागील दोन महिन्यांपासून ही कारवाई सुरू होती. काल इन्कम टॅक्सची टीम रॉय यांच्या कार्यालयात पोहोचली होती. कागदपत्रांची चौकशी सुरू होती. त्यावेळी सीजे रॉय हे आपल्या केबिनमध्ये गेले आणि त्यांनी आपल्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून स्वत: वर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज आल्यामुळे अधिकारी हादरले त्यांनी केबिनकडे धाव घेतली असता रॉय यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.  तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत्यू घोषित केलं.
इतर बातम्या
नाशिक :

Join Whatsapp Group