धक्कादायक ! चौथ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीची आत्महत्या
धक्कादायक ! चौथ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीची आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या आत्महत्यांमागे बऱ्याचदा क्षुल्लक कारण पहायला मिळते. गुजरातच्या अहमदाबाद येथे एका दहावीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याची घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. 

पुन्हा एकदा संकटाची चाहूल, तिन ग्रहांचा 'या' 5 राशींवर परिणाम होणार

सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलगी हातात कीचेन फिरवत लॉबीमध्ये चालत जाताना दिसते. अचानक रेलिंगवरुन उडी मारल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. तिच्या मैत्रिणीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला. उडी मारणाऱ्या मुलीच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मुलीला नवरंगपुरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. पण २५ जुलैला रात्री १० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या आत्महत्येमागे नेमके कारण काय हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group