तीन मुलांचा बाप पण मेव्हणीवर जीव जडला, लग्नासाठी सासरवाडीने नकार देताच पुढे रक्तरंजित थरार घडला
तीन मुलांचा बाप पण मेव्हणीवर जीव जडला, लग्नासाठी सासरवाडीने नकार देताच पुढे रक्तरंजित थरार घडला
img
वैष्णवी सांगळे
गुजरातमधील सुरतमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.  3 मुलांचा बाप असलेल्या पुरुषाने मेहुणीसोबत लग्नाचा हट्टहास धरला. यानंतर कुटुंबात वाद झाला. सासुरवाडीने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या या व्यक्तीने सासुरवाडीच्या तिघांवर हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर गंभीर असलेल्या एका महिलेवर उपचार सुरु आहे. 


नेमकं काय घडलं ? 
सुरत शहरातील उधना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पटेल नगर परिसरातील साई जलाराम सोसायटीमधील एका घरात बुधवारी रात्री उशिरा रक्तरंजित थरार घडला. पत्नी आणि ३ मुलांसह तेथे राहणाऱ्या 34 वर्षीय संदीप घनश्याम गौरने ही रक्तरंजित दुहेरी हत्या केली. भाऊ आणि बहीण लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी त्यांच्या आईसोबत आले होते. संदीप त्याची पत्नी वर्षा गौर आणि तीन मुलांसह एकाच घरात राहत होता. 

संदीपचा मेहुणा निश्चय अशोक कश्यप, त्याची बहीण ममता कश्यप आणि आई शकुंतला देवी यांच्यासह 4 ऑक्टोबर 2025 रोजी प्रयागराजहून सुरतला त्याच्या भावाच्या लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. बुधवारी रात्री उशिरा, साई जलाराम सोसायटीच्या घरात सर्वजण उपस्थित असताना, त्याच घरात राहणारा संदीपने मेव्हणीशी लग्न करण्याची इच्छा मेहुणा आणि सासूकडे व्यक्त केली.

संदीपची इच्छा ऐकून घरातील सर्वांना धक्का बसला. यामुळे कुटुंबात वादविवाद सुरू झाला आणि त्यातून भांडण झाले. त्यानंतर संदीप गौरने त्याचा मेहुणा निश्चय कश्यप, मेहुणी ममता कश्यप आणि सासू शकुंतला देवी यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. त्याचा मेहुणा आणि मेहुणी जागीच मरण पावले. त्याच्या सासूला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत भावंडांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सुरत पोलिस उपायुक्त डॉ. कानन देसाई यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संदीप गौरचा त्याच्या मेहुणीशी लग्न करण्यावरून वाद झाला होता, ज्यामध्ये त्याने त्याचा मेहुणा आणि मेहुणीची हत्या केली, तर सासूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनं नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group