दुर्दैवी ! होर्डिंग लावताना भयंकर घडलं, सातव्या मजल्यावरून १० मजूर पडले अन...
दुर्दैवी ! होर्डिंग लावताना भयंकर घडलं, सातव्या मजल्यावरून १० मजूर पडले अन...
img
दैनिक भ्रमर
गुजरातच्या अहमदाबादमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. होर्डिंग लावताना सातव्या मजल्यावरून १० मजूर पडल्याची घटना घडली आहे. यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर जखमींवर उपचार सुरु आहेत. 

अहमदाबाद येथील विश्व कुंज -२ या बहुमजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर होर्डींग लावण्याचे काम सुरू होते. यादरम्यान संतुलन बिघडल्यामुळे १० मजूर खाली पडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर जखमींवर सध्या सोला सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मृतांची ओळख पटवण्यात यश आले आहे. ते तिघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. रवी, राज आणि महेश अशी मृत मजुरांची नाव आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सर्व मजूर एका जाहिरात कंपनीचे २५X10 फुटांचे होर्डिंग लावण्याचे काम करत होते. 

प्रत्यक्षदर्शिने सांगितले की, होर्डिंगचा एक भाग तुटला आणि खाली पडला. हा तुकडा जवळच्या विजेच्या खांबाला जाऊन धडकला. त्यामुळे जोरदार झटका बसला आणि विजेची तार तुटली. पडणाऱ्या स्ट्रक्चर खाली येऊन एका कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की एक मजूर स्ट्रक्चर सोबत खाली पडतो त्यानंतर इतर मजूर खाली पडतात. त्यानंतर काही लोकं मदतीसाठी धावून येतात.


gujrat |
इतर बातम्या
Join Whatsapp Group