जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा
Dipali Ghadwaje
गुजरातच्या सुरतमधील लाजपोर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 9 कैद्यांनी नुकतीच 12वी ची परीक्षा दिली होती. नुकतेच या परीक्षाचा निकाल आला असून, यामध्ये 9 पैकी सर्वांनी ही परीक्षा पास केली आहे.
याबाबत माहिती देताना लाजपोर कारागृहाचे प्रमुख जाशुआ देसाई म्हणाले, 12वी च्या परीक्षेसाठी कारागृहातील 9 कैदी बसले होते. परीक्षेला बसलेले सर्व कैदी यामध्ये पास झाले आहे. त्यामुळे लाजपोर कारागृहाच्या निकालाची टक्केवारी 100 टक्के आहे.
#WATCH | Surat, Gujarat: Prisoners serving life sentence in Surat's Lajpore central jail passed Gujarat Board examination from jail. pic.twitter.com/Ag58muk2lX