गुजरातमध्ये भीषण अपघात, जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
गुजरातमध्ये भीषण अपघात, जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
img
Dipali Ghadwaje
गुजरातमधून मोठ्या बस अपघाताची घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये जवानांना घेऊन जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. पंचमहल जिल्ह्यात झालेल्या या अपघातात राज्य राखीव पोलीस दलाचे ३८ जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली. या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, एसआरपी जवानांना घेऊन जात असलेली बस पंचमहल जिल्ह्यात उलटली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सर्व ३८ जवान जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान फायरिंग प्रॅक्टिसवर परतताना जवानांच्या बसला हा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्याने बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका तीव्र वळणारवर हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारासाठी दाखल झालेल्या ३८ जवानांपैकी २९ जवानांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ९ जवान गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सर्वांवर वडोदरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group