आधी १६ वर्षीय मुलीशी इन्स्टावरून ओळख केली अन्  मग.....; नेमकं काय प्रकरण?
आधी १६ वर्षीय मुलीशी इन्स्टावरून ओळख केली अन् मग.....; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
गुजरातमधील सुरत येथून पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाने इन्स्टाग्रामवर १६ वर्षीय मुलीशी मैत्री करून संबंध प्रस्थापित केल्यानंतर संबंधित मुलगी गर्भवती झाली. यानंतर तिचा गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकून देण्यात आले होते. पक्षी घिरट्या घालू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

दरम्यान, मुलगी गरोदर राहिल्यानंतर मुलाने तिला गर्भपातासाठी मुंबईहून गोळ्या दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर मुलीचा घरीच गर्भपात झाला. मुलगीने गर्भ नाल्याजवळ फेकून दिला. त्या गर्भाजवळ पक्षी घिरट्या घालत होते. ज्यानंतर हा खुलासा झाला. ही घटना सुरतमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार , 9 जानेवारी रोजी अपेक्षा नगर परिसरात काही मुले खेळत होती. तेवढ्यात त्यांची नजर नाल्याजवळ घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांवर पडली. मुलांनी दगडफेक केली. जवळ जाऊन पाहिलं तर एक गर्भ पडलेला दिसला. मुलांनी आवाज केला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. हा गर्भ एका मुलीचा होता, तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

झोन 4 चे डीसीपी विजय सिंह गुर्जर म्हणाले, गर्भ सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर पोलिसांना संशय आला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची पुष्टी केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाअंती असे आढळून आले की मुलगी 16 वर्षांची होती आणि ती 3 जानेवारीपर्यंत शाळेत गेली होती.

नेमकं काय प्रकरण?

मुलीची इन्स्टाग्रामवर एका 17 वर्षीय मुलाशी मैत्री झाली होती. मुलगा सुरतच्या पांडेसरा येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि त्यांच्यात शारीरिक संबंध होते, त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या गरोदरपणाची माहिती मिळताच मुलगा उत्तर प्रदेश आणि नंतर मुंबईला पळून गेला. पोलिस अधिकाऱ्याने मुलीच्या हवाल्याने सांगितले की, "मुंबईतील मुलाने तिला गर्भधारणा संपवण्यासाठी गोळ्यांचे पॅकेट पाठवले. तिने दोन गोळ्या घेतल्या आणि घरीच गर्भपात केला. तिने गर्भ फेकून दिला. मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे." त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group