नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चांदशी परिसरात घडली. मयत विवाहिता ही इगतपुरी येथील रहिवासी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत विवाहितेचा निखिल रवींद्र सूर्यवंशी याचा सन 2019 मध्ये विवाह झाला होता. सन 2021 पासून तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मारहाण करायचा. नंतर त्याने फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावेत म्हणून तिच्यामागे तगादा लावला. पतीच्या या त्रासामुळे तिला जगणे असह्य झाल्याने तिने घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तिला दोन वर्षांचे मूल आहे. तिच्या अंत्यविधीनंतर पतीसह सासरचे लोक फरार आहेत. या प्रकरणी निखिल सूर्यवंशीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी मोरे करीत आहेत.