पावसाचं थैमान ! ६ गावांना पुराचा वेढा ; १०० हून अधिक लोक अडकले
पावसाचं थैमान ! ६ गावांना पुराचा वेढा ; १०० हून अधिक लोक अडकले
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : गेल्या काही तासांपासून राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसानं हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नांदेडमधील अनेक गावांना पुरानं वेढा घातला आहे. रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस बरसला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सहा गावं पाण्याखाली गेले आहेत. अनेक नागरिक अडकले असून ४० ते ५० म्हशींचा मृत्यू झाला आहे.

मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीय. मुखेड तालुक्यातील हसनाळ, रवानगाव, भासवाडी येथे 100 हून लोक अडकले आहेत. पावसाचा अलर्ट असल्याने खबरदारी म्हणुन सैन्य दलाला पाचारण  करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरहून सैन्य दलाची तुकडी निघाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

हृदयद्रावक ! फर्निचर दुकानाला मध्यरात्री आग, झोपेतच संपूर्ण कुटुंबाचा अंत; नेमकं काय घडलं ? वाचा

पावसाच्या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पूरात अडकलेल्यांना एसडीआरएफरच्या टीमने बाहेर काढलंय, यावेळी बाहेर आलेल्या महिलांनी आक्रोश केला आहे. इतर गावातही अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group