राज्यात मुसळधार ! पावसाचं जोरदार कमबॅक; मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज
राज्यात मुसळधार ! पावसाचं जोरदार कमबॅक; मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज
img
वैष्णवी सांगळे
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. रात्रभर अतिमुसळधार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले. फक्त मुंबईच नाही तर पूर्ण राज्यात भारतीय हवामान विभागाकडून मोठा अलर्ट जारी करण्यात आलाय. सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा, असा थेट इशाना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलाय.

पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर मुंबई आणि मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यात हवामान विगाकडून वर्तविण्यात आली आहे. अशातच मुंबईच्या हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज आज खरा ठरतोय. काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, सध्या देखील पावसाचा जोर कायम आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. 

हवामान विभागाने १६- १७ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी ' रेड अलर्ट' जारी केला आहे. तर 16 ऑगस्ट रोजी रायगडसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. शुक्रवारी, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाण्यात आठवड्याच्या शेवटी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. परिणामी पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र दाणादाण उडवली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर त्याचा परिणामी रेल्वे आणि वाहतुकीवर देखील होऊ शकतो.

पुढील मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट असलेल्या रायगड आणि रत्नागिरीमध्येही जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.तर 16 ऑगस्ट रोजी रायगडसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group