पुढील ४८ तास धोक्याचे ! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
पुढील ४८ तास धोक्याचे ! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने काहइ ठिकाणी विश्रांती घेतली होती. मात्र, आता परत एकदा पावसाचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती.आता पुढचे तीन दिवस कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. 

महाराष्ट्राच नाही तर देशभरात पावसाने धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळत आहे. हवामान तज्ज्ञांनी गणेशोत्सवाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्हांना मुळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. 

आजचे राशिभविष्य ! ४ सप्टेंबर २०२५ ; आज या राशीच्या लोकांनी बोलण्यावर विशेष लक्ष द्या, नाहीतर नुकसान होऊ शकते...

बाकी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सततच्या पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झालंय. राज्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. देशात पावसाचे संकट आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group