गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे मुसळधार तर कुठे पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. मात्र आता पुढील 24 तासांसाठी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार सरी बरसतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे,अनेक जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.