महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम, पुढील २४ तास महत्त्वाचे, कोणत्या जिल्हयांना 'यलो अलर्ट' ?
महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम, पुढील २४ तास महत्त्वाचे, कोणत्या जिल्हयांना 'यलो अलर्ट' ?
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. या पावसामुळे गहू, हरभरा आणि ज्वारीसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच शेतीमालाला भाव कमी त्यात हे अस्मानी संकट ज्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. 

काही दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे.  रेणापूर तालुक्यात सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे काही ठिकाणी पत्र्याची घरे पडली आहेत; तर शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. आज, 25 फेब्रुवारीला, राज्यातील हवामान कसं असेल ते जाणून घ्या.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
राज्यातील सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत आज दिवसभर हलक्या सरींसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय मराठवाडा आणि विदर्भला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.

काही दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांत या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group