राज्यात अस्मानी संकट, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट
राज्यात अस्मानी संकट, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील काही भागांत पावसासाठी अनुकूल हवामान राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.कोकणात ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यात हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सांगलीत हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे.  जळगाव, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे, तसेच सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यात उष्ण व दमट वातावरणाची शक्यता आहे, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज जारी केला आहे. 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला. तसेच परभणी, बीड आणि हिंगोलीत हलक्या पावसाची अधिक शक्यता आहे. लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ विभागात नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ. चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाण्यात उष्णता कायम राहील, असा अंदाज आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group