राज्यावर अवकाळी संकट, ! ''या'' 17 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा
राज्यावर अवकाळी संकट, ! ''या'' 17 जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा
img
Nandini khandare More




राज्यातील हवामानात कमालीचे बदल होत असून राज्यात काही ठिकाणी उकाडा तर काही ठिकाणी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला दरम्यान आता पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आली आहे.  मराठवाड्यातील काही भागात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला. 

उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह पावसाने मोठे थैमान घातले. तब्बल 100 लोकांचा यादरम्यान मृत्यू झाला. निसर्गाचे एक भयानक रूप उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळाले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 45.9 अंश सेल्सिअस तापमान होते. अनेक जिल्ह्यांमध्ये 44 च्या आसपास तापमान नोंदवण्यात आले. जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, पालघर, रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला.

नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. कुठे पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. बीड येथे अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कऱ्हेवडगाव येथे घराचे व शेतीचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अकोला शहरात उष्णतेचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. उष्णतेने कहर केला.

दरम्यान, मालेगावात उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण होत आहे. मालेगाव तालुक्यातील काही विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. तर काही ठिकाणी विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. त्यातच उन्हाळ्याचा भडका वाढत आहे. पाण्याची दिवसेदिवस पातळी खालावत चाललेली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह पालघर आणि ठाणे येथे उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत असून यामुळे नागिरकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group