गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत केले आहे. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.पुराच्या तडाख्यातून जेमतेम सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराष्ट्र्र पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांकडून काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे.
आधीच पावसाने हैराण झालेल्या महाराष्ट्रात पुढील आठवड्यात देखील पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या 6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यात आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागावाकडून वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा एकदा निर्माण होणार असल्याने राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, आणि पुणे घाट परिसरासह इगतपुरी, कसारा, लोणावळा, खंडाळा या भागात पावसाचा अंदाज असून या विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छ.संभाजीनगर, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरातील गगनबावडा, कोयना परिसराला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.