नाशिक इगतपुरी : जिल्ह्यामध्ये रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये दरड कोसळली होती. जिल्ह्यातील चार तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केलेली आहे एकूणच जिल्ह्यामध्ये 170. 7 मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत करण्यात आलेली आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये तीन मे पासून सुरू झालेला बेमोसमी पाऊस 24 दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण 170 पॉईंट सात मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे तर सोमवारी उशिरा 12 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी नाशिक या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी रात्री उशिरा विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्यातील सादूडने या ठिकाणी मुकुंदा लक्ष्मण वड यांचा हेल्यावर रात्री झालेल्या पावसामुळे नैसर्गिक विज पडून मृत्यू झाला .
इगतपुरी तालुक्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कसारा घाट येथे मंगळवारी सकाळी दरडीचा काही भाग कोसळला त्यामुळे वाहतुकी वरती परिणाम झाला होता तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये बागलाण येवला निफाड आणि चांदवड या चार तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना खबरदारीचे उपाय केल्याचा आव्हान केलेला आहे तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केलेला आहे.