यंदाचा पावसाळ्याने देशभरात धुमाकूळ घातला आहे. यंदाचा पाऊसाची सरासरी समाधानकारक असली तरीही या पावसाळ्याचे फायद्या सोबत अनेक निकसानाही झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 2024 चा मान्सून हंगाम संपूर्ण भारतात अनेकांसाठी प्राणघातक ठरला, ज्यामध्ये तीव्र हवामानाच्या घटनांमुळे 1,492 मृत्यूची नोंद झाली. आकडेवारीवरून असे दिसून आले की, बहुतांश मृत्यू पूर आणि पावसाशी संबंधित घटनांमुळे झाले. ज्यात 895 जणांचा समावेश आहे. तर पावसाळी हंगामात वादळी वाऱ्यामुळे आणि विजेच्या धक्क्यांमुळे 597 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
पूर आणि पावसामुळे मृत्यू
मान्सून 2024 च्या पावसाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या राज्यांपैकी, केरळमध्ये 30 जुलै रोजी पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक वायनाड जिल्ह्यात विनाशकारी भूस्खलनामुळे पूर आणि मुसळधार पावसामुळे 397 मृत्यूची नोंद झाली. आसाम आणि मध्य प्रदेशात देखील अनुक्रमे 102 आणि 100 मृत्यूंसह लक्षणीय मृत्यूची नोंद झाली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पूर आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला.
वादळी वारे आणि वीज कोसळून मृत्यू
आयएमडीच्या आकडेवारीने मेघगर्जना आणि विजेच्या धक्क्यांचा प्राणघातक परिणाम अधोरेखित केला. मध्य प्रदेशात सर्वाधिक 189 मृत्यू झाले, त्यानंतर उत्तर प्रदेशात 138, बिहारमध्ये 61 आणि झारखंडमध्ये 53 मृत्यू झाले.
दरम्यान , हवामान अहवाल देताना आयएमडीने 525 मुसळधार पाऊस (115.6 मिमी ते 204.5 मिमी पर्जन्यवृष्टी) आणि 96 अत्यंत मुसळधार पावसाच्या घटना नोंदवल्या आहेत. ज्यामध्ये 204.5 मीमी पेक्षा अधिक पावसाचा समावेश आहे. मान्सूनने 2020 नंतरचा सर्वाधिक पाऊस देखील नोंदवला, ज्यामध्ये देशात 934.8 मिमी पाऊस झाला-जो दीर्घकालीन सरासरीच्या 107.6% आहे.