धक-धक गर्लच्या चित्रपटासाठी ''तो''  करायचा संपूर्ण थिएटर बुक, कोण आहे ''हा'' बॉलीवूडचा प्रसिद्ध व्यक्ती ?
धक-धक गर्लच्या चित्रपटासाठी ''तो'' करायचा संपूर्ण थिएटर बुक, कोण आहे ''हा'' बॉलीवूडचा प्रसिद्ध व्यक्ती ?
img
नंदिनी मोरे
बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे लाखो करोडो चाहते संपूर्ण जगभरात पाहायला मिळतात. आजही लोकं तिच्या अभिनायसह तिच्या सौंदर्यावर आणि नृत्यावर  देखील भाळतात.अनेक चाहते तर माधुरी साठी वाट्टेल ते करायला तयार असतात. पण पण फक्त चाहतेच नाही तर अनेक कलाकारही माधुरीसाठी वेडे होते. असाच एक कलाकार जो बॉलिवूडचा महत्त्वाचा भाग होता. माधुरीला पाहाताच हा कलाकार  तिच्या प्रेमात पडला. माधुरीच्या सौंदर्याने या कलाकाराला भुरळ घातली होती. आणि तिचे चित्रपट पाहताना  तासंतास  तिच्याकडे पाहत राहायचा.

माधुरी दीक्षितचा हा चाहता कोणी सामान्य माणूस नव्हता तर देशातील सर्वात लोकप्रिय चित्रकार एम.एफ. हुसेन होते. त्यांनी माधुरी दीक्षितमुळे ‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपट 73 वेळा पाहिला होता. हुसेन माधुरीचे इतके मोठे चाहते होते की त्यांनी अभिनेत्रीसोबत ‘गज गामिनी’ हा चित्रपटही बनवला होता. हुसेन यांनी अनेक चित्रपटांमध्ये लेखक म्हणूनही काम केलं आहे. जेव्हा त्यांनी माधुरी दीक्षितला पहिल्यांदा चित्रपटात पाहिलं तेव्हा ते तासंतास तिच्याकडे पाहत बसले. माधुरीच्या सौंदर्याने त्याच्यावर जादू केली होती. तिचा चित्रपट पाहण्यासाठी ते संपूर्ण थिएटर बुक करायचे

‘हम आपके हैं कौन’ हा चित्रपटात हुसेन यांनी पहिल्यांदा माधुरीला पाहिलं. त्यांनी हा चित्रपट 73 वेळा पाहिला आणि माधुरीसोबत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. ‘गज गामिनी’ या चित्रपटात त्यांनी माधुरी दीक्षितला मुख्य अभिनेत्री बनवलं आणि चित्रपटाचे दिग्दर्शनही स्वतः केले. त्यांनी कामना चंद्रासोबत हा चित्रपट लिहिला. माधुरीसोबत नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी देखील या चित्रपटात होते, परंतु हा चित्रपट फ्लॉप झाला. एमएफ हुसेन यांचे 9 जून 2011 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. पण माधुरीच्या चाहत्यांमध्ये त्यांचासारखा चाहता हा कदाचित कोणी झाला असेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group