दीपिका नंतर आता अल्लू अर्जुनलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता ? नेमकं काय घडलं ?
दीपिका नंतर आता अल्लू अर्जुनलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता ? नेमकं काय घडलं ?
img
DB
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध हिरो अल्लू अर्जुनला दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी चित्रपटातून  बाहेर काढले असल्याची मोठी  माहिती समोर येत आहे. अल्लू अर्जुनने गेल्या वर्षी साइन केलेला हा चित्रपट सध्या थांबवण्यात आला आहे. याआधी संदीप वांगाच्या चित्रपटातून दीपिका पदुकोणलाही बाहेर काढण्यात आले होते. एका वृत्तवाहिनेने दिलेल्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने गेल्या वर्षी 'ॲनिमल' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासोबत एक चित्रपट साइन केला होता. मात्र, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट सध्या थांबवण्यात आला आहे आणि अल्लू अर्जुनला यातून बाहेर काढण्यात आले आहे.



याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात येत आहे की, अल्लू अर्जुनच्या जागी आता ज्युनियर एनटीआरला या चित्रपटात नायक म्हणून कास्ट केले जाऊ शकते. अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांनी यापूर्वी एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळे जर हे खरं ठरलं, तर ही एक मोठी बातमी असेल.

दरम्यान ,काही आठवड्यांपूर्वीच संदीप रेड्डी वांगाने दीपिका पदुकोणला प्रभासच्या 'स्पिरिट' या चित्रपटातून बाहेर काढले होते. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने ८ तासांची शिफ्ट, मोठी फी आणि चित्रपटाच्या नफ्यात वाटा अशा काही मागण्या केल्या होत्या, ज्या संदीप वांगाला मान्य नव्हत्या. दीपिकाने नुकतंच मुलीला जन्म दिला असून, ती सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group