मोठी अपडेट : संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात , अल्लू अर्जुनला
मोठी अपडेट : संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात , अल्लू अर्जुनला "या" कारणासाठी पुन्हा समन्स
img
Dipali Ghadwaje
‘पुष्पा 2’च्या प्रीमिअर दरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी समन्स बजावले आहेत. याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्याची सुटका झाली. 

त्यानंतर घटनेच्या चौकशीसाठी हैदराबाद पोलिसांनी त्याला समन्स बजावले आहेत. अल्लू अर्जुनला आज (मंगळवार) पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या प्रीमिअरला जेव्हा अल्लू अर्जुन पोहोचला, तेव्हा थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यात एम. रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अल्लू अर्जुनला समन्स

अल्लू अर्जुनला आज सकाळी 11 वाजता चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. या समन्सच्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुन त्याच्या लीगल टीमसोबत विविध मुद्दयांवर चर्चा करत आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अल्लू अर्जुन, थिएटर व्यवस्थापन आणि अभिनेत्याच्या टीमविरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सिटी कोर्टने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. याविरोधात त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group