सध्या सर्वत्र 'पुष्पा 2: द रुल' ची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट दिवसेंदिवस बंपर कमाई करत आहे. चित्रपटाने सात दिवसात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे.
'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालत आहे.
'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यात पठाण, जवान, बाहुबली आणि ॲनिमल यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
या चित्रपटाने वीकेंडला छप्परफाड कमाई केली होती. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'पुष्पा 2' ऑफिस कलेक्शन दिवस 7
'पुष्पा 2' ने पहिल्या दिवशी 164.25 कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी 93.8 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या दिवशी 119.25 कोटींची कमाई झाली. या चित्रपटाने वीकेंडला तर धुमाकूळ घातला.
चित्रपटाने चौथ्या दिवशी 141.5 कोटींची तगडी कमाई केली. चित्रपटाच्या पाचव्या दिवशी 'पुष्पा 2'ने 65.1 कोटी रुपये कमावले असून चित्रपटाच्या सहाव्या दिवशी 52.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
तसेच पेड प्रिव्ह्यूजमध्ये 10.65 कोटी रुपये कमावले. मीडिया रिपोर्टनुसार,'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाने रिलीजच्या सातव्या दिवशी 42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने 687.00 कोटी रुपये कमावले आहे.
'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने तेलगूमध्ये 232.75 कोटी रुपये, हिंदीमध्ये 398 कोटी रुपये, तामिळमध्ये 39 कोटी रुपये, कन्नडमध्ये 5.05 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 12.1 कोटी रुपये कमावले आहेत. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपट ॲक्शनचा धमाका आहे.