पहिल्याच दिवशी  'पुष्पा 2' च्या मेकर्सना कोट्यवधीचा फटका ; नेमकं असं काय घडलं?
पहिल्याच दिवशी 'पुष्पा 2' च्या मेकर्सना कोट्यवधीचा फटका ; नेमकं असं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2: द रुल’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. ‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये प्रीमियर आयोजित करण्यात आला होता, जिथे मोठ्या संख्येने चाहते पोहोचले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. यात रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान , निर्मात्यांना मोठा धक्का बसणार आहे कारण ‘पुष्पा 2’ चित्रपटगृहात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा चित्रपट पायरसी साइटवर ऑनलाइन लीक झाला आहे.

‘पुष्पराज’ ही खरी आग आहे, हे अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘पुष्पा द राइज’ रिलीज झाल्यानंतर 3 वर्षांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. जिथे पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच रिलीज झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट पायरसी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.

निर्मात्यांना बसणार फटका?

ट्रेड एक्स्पर्ट्स याकडे मोठे नुकसान म्हणून पाहत आहेत आणि यामुळे निर्मात्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे. वास्तविक, ‘ पुष्पा 2’ चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल जात आहेत, त्यामुळे अनेक प्रेक्षकांना चित्रपटाचे तिकीट मिळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांना ‘पुष्पा 2’ फुकट बघायला मिळाला तर ते थिएटरमध्ये जाणार नाहीत. प्रेक्षक ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी आतुर झाले असताना, त्याचे लीक होणे निर्मात्यांसाठी अतिशय वाईट आहे.
 
पुष्पा 2 कुठे लीक झाला?

 अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 Ibomma, Movierulz, Tamilrockers, Filmyzilla, Tamilyogi, Tamilblasters, Bolly4U, Jaisha Movies, 9xMovies आणि Moviesda सारख्या पायरसी प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

अहवालात ‘पुष्पा 2 द रुल मूव्ही डाउनलोड’, ‘पुष्पा 2 द रुल मूव्ही एचडी डाउनलोड’, ‘पुष्पा 2 द रुल तमिलरॉकर्स’, ‘पुष्पा 2 द रुल फिल्मझिला’, ‘पुष्पा 2 द रुल टेलिग्राम लिंक’ आणि त्यानंतर गुरुवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘पुष्पा 2 द रुल मूव्ही फ्री एचडी डाउनलोड’ची हे किवर्ड्स ऑनलाइन सर्चमध्ये ट्रेंडिंग होते.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group