एक-दोन नाही तर तब्बल पाच राष्ट्रीय पुरस्कार ! ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?
एक-दोन नाही तर तब्बल पाच राष्ट्रीय पुरस्कार ! ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?
img
Nandini khandare More
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. मात्र, राष्ट्रीय पुरस्कारांच्या बाबतीत एका दिग्गज अभिनेत्रीने तब्बल ५ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे. 

गुजरातच्या केवडिया येथील एकता नगरमध्ये काल (२२ सप्टेंबर २०२६) रोजी ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.या प्रतिष्ठित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. चित्रपट विश्वातील दमदार कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. कार्तिक आर्यन आणि मामूट्टी यांना संयुक्तपणे प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार राष्ट्रपतींकडून मिळाला. कार्तिकला 'चंदू चॅम्पियन' मधील कामगिरीसाठी तर मामूट्टीने 'ब्रमयुगम'साठी हा सन्मान देण्यात आला. यामी गौतमला 'आर्टिकल 370' साठी प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या दमदार अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणाऱ्या एका अभिनेत्रीने चक्क पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. ही कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी या आहेत. शबाना आझमी यांच्या नावावर भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सर्वकालीन विक्रम आहे.

'या' चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

अंकुर - Ankur (१९७४) – त्यांचा पहिला चित्रपट आणि पहिला राष्ट्रीय पुरस्कार.

अर्थ - Arth (१९८२) – महेश भट्ट यांच्या या चित्रपटाने वैवाहिक जीवनातील वेदना जिवंतपणे मांडल्या.

खंडहर-Khandhar (१९८३) – मृणाल सेन यांच्या चित्रपटातील गंभीर भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

पार - Paar (१९८४) – गौतम घोष यांच्या चित्रपटातील 'रामा'च्या भूमिकेसाठी त्यांना चौथा पुरस्कार मिळाला.

गॉडमदर - Godmother (१९९८) – माफिया क्वीन रामबाईच्या भूमिकेने सर्वांना चकित केले आणि आपला पाचवा पुरस्कार जिंकला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group