अभिनेता सलमान खान व त्याचे वडील प्रसिद्ध चित्रपट कथाकार सलीम खान यांचे नाव जगजाहीर आहे. सलीम खान हे आपल्या तिन्ही मुलांत सर्वात जास्त प्रेम सलमानवर करतात, अशाही चर्चा अनेकदा रंगतात.
सलमानच्या चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा थेट त्याच्या एखादा कार्यक्रम असो, सलीम खान अनेकदा त्याच्यासोबत दिसतात. एवढंच कशाला, तर सलमानच्या प्रत्येक बऱ्या-वाईट काळात सलीम खान हे सलमानच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे राहिलेले दिसले आहेत. मात्र सलीम खान यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सलमानबाबत एक वक्तव्य करुन, त्यांच्या चाहत्यांना चांगलंच बुचकळ्यात टाकलं.
काय म्हणाले सलीम खान?
एका मुलाखतीत सलीम खान यांनी सलमानसोबतचा घरातील संवाद सांगितला. या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, 'तो असे काही करतो जे मला आवडत नाही किंवा त्याने काहीतरी चूक केली आहे असे मला वाटते, तेव्हा मी त्याच्याशी बोलत नाही. कधीकधी आमच्यातला अबोला ६ महिन्यांपर्यंत टिकतो. मग जर मी खिडकीजवळ बसलो असेल तर तो शांतपणे रेलिंगजवळून जातो. तो मला न भेटताच घराबाहेर पडतो. नंतर, तो परत येतो आणि म्हणतो, 'माफ करा, मी जे केले ते बरोबर नव्हते.
लोक भूतकाळ विसरतात
या मुलाखतीत त्यांनी आयुष्याचे अनेक पैलूही चाहत्यांसमोर मांडले. ते पुढे म्हणाले, 'मी पाहिले आहे की जेव्हा माणूस आयुष्यात यशस्वी होतो तेव्हा तो आपला भूतकाळ विसरतो. तो एक व्यक्ती म्हणून कसा वाढला, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. जेव्हा एखादा क्रिकेटपटू महानता प्राप्त करतो तेव्हा तो फक्त त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो आणि इतर काहीही नाही.
सलमानलाही वाटले वाईट
सलमानने एकदा तो वागण्या-बोलण्यात त्याच्या वडिलांसारख्याच असल्याबद्दल सांगितले होते. सलीमने प्रामाणिकपणे आणि थोड्या विनोदाने त्यावर उत्तर दिले. ते म्हणाले, 'बेटा, हे तुझ्यासाठी कौतुकास्पद असू शकते. पण माझ्यासाठी नाही. कारण माझ्या कोणत्याही सवयी तुम्हाला वारशाने मिळाव्यात असे मला वाटत नाही. माझ्या उत्तरानंतर सलमानला वाईट वाटले होते, असे सलीम खान यांनी स्पष्ट केले.
कसे आहे बापलेकाचे संबंध?
सलीमने असेही सांगितले की त्याचे आणि सलमान खानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आपल्या वडिलांच्या बुटांचा आवाज ऐकून मुलांना भिती वाटावी, असा पालक होणे मला मान्य नव्हते. त्यामुळे मी माझ्या मुलांसोबत मैत्रीचे संबंध ठेवले.