ज्येष्ठ पटकथा लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची काल अचानक प्रकृती बिघडली. त्यांना १७ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच सलमान खानने रुग्णालयात धाव घेतली. तसेच संपूर्ण खान कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली. या बातमीनंतर चाहते सलीम खानच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलीम खान यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
९० वर्षीय सलीम खान यांचा रक्तदाब अचानक वाढला होता, त्यामुळे मेंदूच्या उजव्या बाजूला अंतर्गत रक्तस्त्राव झाला. या कारणास्तव त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर बुधवारी सकाळी शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.
वडिलांना रुग्णालयात दाखल करताच सलमान खान लिलावतीमध्ये त्यांच्या भेटीला पोहोचला होता. मंगळवारी रात्री त्याला रुग्णालयातून बाहेर पडताना पाहिलं गेलं. हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामध्ये सलमानच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती.
सलीम खान यांची भेट घेऊन तो रुग्णालयाबाहेर पडताना पापाराझींनी सलमानला घेरलं. पापाराझी, फोटोग्राफर आणि सुरक्षारक्षक यांच्या गोंधळादरम्यान सलमान खूपच शांत होतं. परंतु त्याच्या चेहऱ्यावर काळजी, चिंता दिसून येत होती. व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान त्याच्या कारमध्ये डोळे बंद करून शांतपणे बसल्याचं पहायला मिळालं.