बिग बॉस 19 प्रेक्षकांच्या भेटीला, स्पर्धकांची यादी आली समोर
बिग बॉस 19 प्रेक्षकांच्या भेटीला, स्पर्धकांची यादी आली समोर
img
दैनिक भ्रमर
बिग बॉस 19 हा शो पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या शोच्या प्रीमियरची तारीख अजून समोर आली समोर नसली तरी मेकर्सनी घरातील सदस्यांसाठी सेलिब्रिटींची चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. 

घरात असेल सीक्रेट रूम 
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हा शो पुढील महिन्यात 24 ऑगस्टला सूरू होत आहे. रिबाइंड थीमवर बेस हा सीझन असणार आहे. घरात यावेळी सीक्रेट रूम पण असणार आहे. या सीझनचे सुरुवातीचे 3 महीने सलमान होस्ट करणार आहे. पण त्यानंतर मेकर्स नवीन होस्टचा विचार करू शकतात.

चर्चेत कोण ?
अभिनेत्री हुनर हाली हिला मेकर्सनी आगामी सीझनमधील सहभागासाठी विचारले आहे. हुनर सध्या एका पौराणिक मालिकेत दिसते आहे. वीर हनुमान : बोलो बजरंगबली की जयमध्ये हुनर कैकेयीच्या भूमिकेत दिसते आहे. यापूर्वी ती 12/24 करोल बाग’, ‘दहलीज’, ‘छल शह और मात’, ‘पटियाला बेब्स’ आणि 'ससुराल गेंदा फूल' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

ही आहे संभाव्य स्पर्धकांची यादी
अलीशा पवार, गौरव तनेजा, कनिका मान, कृष्णा श्रॉफ, अर्शिफा खान, राज कुंद्रा, मिस्टर फैसु, डेजी शाह, पारस कलनावत, मिकी मेकओवर, अनीता हसनंदानी, शरद मल्होत्रा मुनमुन दत्ता, लता सभरवाल, आशीष विद्यार्थी, अपूर्व मखीजा, पूरव झा, खुशी दुबे, चिंकी मिंकी, धीरज धूपर, राम कपूर, गौतमी कपूर

हबुबूचे नावही चर्चेत
बिग बॉसचा यंदाचा सीझन AI मुळे अधिक खास ठरणार आहे. स्पर्धकांमध्ये एक AI डॉलचाही समावेश असणार आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच असा प्रकार घडणार आहे ज्यामध्ये नॉन ह्युमन स्पर्धक असणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group