बिश्नोई गँगकडून धमकी, बिग बॉसच्या सेटवर सलमानच्या सुरक्षेसाठी  60 सुरक्षा रक्षक तैनात
बिश्नोई गँगकडून धमकी, बिग बॉसच्या सेटवर सलमानच्या सुरक्षेसाठी 60 सुरक्षा रक्षक तैनात
img
दैनिक भ्रमर
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत तर वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला Y+ सुरक्षा दिली होती. दरम्यान ,  सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी मिळाली आहे . 18 ऑक्टोबरला म्हणजेच  सकाळी सलमानला धमकीचा मेसेज आला होता. लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवण्यासाठी सलमानकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
तरीही, सलमान खान बिग बॉस १८ च्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचला. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून शूटिंग सुरू आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान शुटिंगला जाणार नसल्याचं आधी म्हटलं जात होतं. पण सलमान खानने बाहेर पडून शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शूटिंगसाठी तो फिल्मसिटीला पोहोचलाय. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ETimes च्या माहितीनुसार, सेटवर सलमानसाठी एक खास कंपाउंड बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये कोणालाही प्रवेश नाहीये. कंपाउंडच्या आत सलमानचा बंगला आहे, जेथे मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. येथे ओळखपत्र दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

‘बिग बॉस 18’ च्या टीमला शूट संपेपर्यंत सेटवरच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कुठेही बाहेर जाता येणार नाहीये. शूटिंग दुपारच्या जेवणानंतर सुरू झाली आहे. जी रात्रीपर्यंत चालणार आहे. सलमान खानने त्याच्या चित्रपटाचे शुटिंगही पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी केली आहे.

सलमान खान शुटिंग करत असलेल्या सेटवर 60 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. 
सलमानच्या Y+ सुरक्षेत 2-4 कमांडोसह 11 पोलीस आहेत. मात्र आता या सुरक्षेत आणखी वाढ केली जाणार आहे. सलमान खान जिथे जाईल तेथील पोलीस स्टेशनला त्याआधी माहिती दिली जाईल. त्या जागेची स्थानिक पोलिसांकडून कसून चौकशी केली जाईल. तसेच सलमानसोबत एक पोलीस देखील आहे. जो सर्व प्रकारची शस्त्रे वापरण्यात माहीर आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group