पोहायला गेलेल्या तिघांवर काळाचा घाला ! जगबुडी नदीच्या डोहात दुर्दैवी अंत
पोहायला गेलेल्या तिघांवर काळाचा घाला ! जगबुडी नदीच्या डोहात दुर्दैवी अंत
img
Nandini khandare More

पोहायला गेलेल्या तिघांवर काळाचा घाला घातला असून तीनही जणांचा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी अंत जाहला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे . 
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू झाला असून  पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही घटना खेड आणि भोसते गावांच्या दरम्यान असलेल्या जगबुडी नदीच्या डोहात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेजण पोहण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र, पाण्याचा वेग आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोध आणि मदतकार्य सुरू करण्यात आले असून, मृतांची ओळख पटविण्याचे कामही सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नद्या, डोह आणि धोकादायक पाणवठ्यांमध्ये उतरताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.या दुर्घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group