भयंकर !  हत्ती थेट महिला पर्यटकाच्या अंगावरच पडला, जागीच मृत्यू ; Video व्हायरल
भयंकर ! हत्ती थेट महिला पर्यटकाच्या अंगावरच पडला, जागीच मृत्यू ; Video व्हायरल
img
Nandini khandare More



सुट्टीची मजा घेण्याकरता गेलेल्या एका महिलेला तिचा जीवच गमवावा लागल्याची हृदयड्रावक घटना घडली आहे. या घटनेनं सोशल मीडियावर एकच हालहाल व्यक्त केली जात आहे.  कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , या कॅम्पमध्ये आलेल्या चेन्नईतील एका 33 वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. दोन हत्तींची लढाई सुरू असताना ही महिला या दोन्ही हत्तींच्यामध्ये फसली आणि चिरडून मेली. ही महिला हत्तींना अंघोळ करताना पाहत होती. त्यावेळी कंचन नावाच्या हत्तीने मार्तंडा नावाच्या हत्तीवर हल्ला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नदी किनारी असलेल्या सर्वांची एकच धावपळ उडाली आणि त्याचवेळी ही महिला भांबावली. ती सावरण्याच्या आधीच हत्तींच्या कचाट्यात थांबली आणि हत्तीच्या अंगाखाली येऊन चिरडून मेली.

जेव्हा हत्तींची लढाई सुरू झाली आणि ही महिला हत्तींच्या कचाट्यात सापडली तेव्हा तिला वाचवण्यासाठी महावतांनी पुरेपूर प्रयत्न केले. पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल गेले. लढाई करताना हत्तीचं संतुलन बिघडलं. यातील मार्तंडा हत्ती थेट महिलेच्या अंगावरच पडला. मार्तंडा हत्ती उठत असतानाच ही महिला चिरडली गेली. त्यामुळे तिचा जाग्यावरच मृत्यू झाला. यावेळी महिला प्रचंड किंचाळत होती. जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तिला वाचवण्याचे लोकांनी प्रयत्नही केले. पण हत्तींच्या रुद्रावतारापुढे त्यांचं काही चाललं नाही.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत नदी किनारी असंख्य हत्ती अंघोळ करताना दिसत आहेत. पर्यटकही किनाऱ्यावर आहेत. काही पर्यटक पाण्यात आहेत. कंचन नावाच्या हत्तीच्या अंगावर माहूत बसला आहे. किनाऱ्यावर दोन महिला आहेत. एकीच्या हातात बाळ आहे. दोन्ही पाण्यात उतरल्यानंतर हत्ती अचानक बेफाम झाले. कांचन हत्तीने मार्तंडावर हल्ला केला. त्यामुळे मार्तंडा हत्ती खाली कोसळला. हत्तींचा हल्ला सुरू झाल्यानंतर या दोन्ही महिलांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यातील बाळ घेतलेली महिला पळण्यात यशस्वी झाली. पण दुसरी महिला मार्तंडाच्या अंगाखाली येऊन चिरडली. बराच वेळ मार्तंडा पडलेला असल्याने या महिलेला हालचाल करण्याची आणि निसटण्याची संधीच मिळाली नाही. तर कांचन हत्तीला शांत करण्यासाठी माहुताने प्रचंड प्रयत्न केले. पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नसल्याचंही दिसत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group