मोठी बातमी ! उष्माघातामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
मोठी बातमी ! उष्माघातामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
राज्यातील वातावरणात कमालीचे बदल होत असून गेल्या काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे उष्मघाताचा देखील धोका वाढला आहे. दरम्यान आता बुलढाणा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.  उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पारा ४० पार गेला आहे.अशातच बुलडाण्यामध्ये उष्माघातामुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं ही घटना घडली आहे. संस्कार सोनटक्के (वय११) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. शेगावमधील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये संस्कार सोनटक्के हा इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. संस्कारला उन्हाचा फटका बसला. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी त्याला अकोला येथे घेऊन जात होते. पण वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संस्कारच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group