गुटखा ठरला घटस्फोटाचं कारण ! ती नवऱ्याच्या खिशातून पुडी चोरून खायची, आणी मग...
गुटखा ठरला घटस्फोटाचं कारण ! ती नवऱ्याच्या खिशातून पुडी चोरून खायची, आणी मग...
img
दैनिक भ्रमर
नवरा बायकोच नातं कास असत कशी आंबट तर कधी  गोड, हसत खेळात असताना कधी भांडण सुरु होईल, आणि भांडणात केव्हाही गोड होतील हे सांगताच येत नाही. काही जोडपे भांडतात रुसतात  पण एकमेकांची साथ सोडत नाही. पण  आज काल कोणत्या कारणावरून कोणाचा घटस्फोट होईल सांगता येत  नाही. अशाच एका जोडप्याचा एका अजब कारणावरून घटस्फोट झाल्याची घटना आग्रा येथे घडली आहे. आग्रा येथील एका नवरा-बायकोचा घटस्फोट होण्याचं कारण ठरलाय गुटखा.  .

ही घटना आहे आग्रा शहरातली. 2022 मध्ये या दोघांचं लग्न झालं. नवरा एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. बायको गृहिणी होती. नवऱ्याला गुटखा खायची सवय होती. बायकोही कधीतरी त्याच्यातला गुटखा चाखत असे. पुढे बायकोलाच गुटखा खायचं व्यसन लागलं आणि परिस्थिती बिघडली. बायको चक्क नवऱ्याच्या खिशातला गुटखा चोरून खाऊ लागली. हे नवऱ्याला अजिबात आवडलं नाही. त्याने त्यावरुन तिला अनेकदा ऐकवलं. विरोध केला. पण बायकोने त्याच्या विरोधाला अजिबात जुमानलं नाही. शेवटी दोघांची भांडणं होऊ लागली.

वैतागलेली बायको घर सोडून माहेरी निघून गेली. तिथे जाऊन तिने नवऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी ही तक्रार समुपदेशन केंद्राकडे सोपवली. बायको आपल्या खिशातून गुटखा चोरुन खाते म्हणून नवऱ्याने घटस्फोटाची मागणी केली. त्यावर मी फक्त चवीपुरता गुटखा खाते, माझा नवरा मात्र भरपूर गुटखा आणून घरात ठेवतो आणि सगळा खाऊन संपवतो, मी त्यांना कधीही गुटखा खाण्यावरुन बोलले नाही, मी चवीला घेतला तर लगेच अडचण झाली, असं प्रत्युत्तर बायकोने दिलं आहे.

काउन्सेलर डॉ. यांनी नवरा-बायको दोघांनीही गुटखा सोडावा, असा सल्ला दिला आहे. शेवटी दोघांनीही गुटखा सोडण्याचं ठरवलं आहे. अद्याप तरी घटस्फोट झालेला नाही. तंबाखु आणि दारु या गोष्टी कुटुंब कलहाचं एक प्रमुख कारण असल्याचं डॉ. सतीश खिरवार यांनी म्हटलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group