बस्तरच्या जंगलात भीषण चकमक;  सुरक्षा दलांनी केला 30 नक्षलवाद्यांचा खात्मा
बस्तरच्या जंगलात भीषण चकमक; सुरक्षा दलांनी केला 30 नक्षलवाद्यांचा खात्मा
img
दैनिक भ्रमर
छत्तीसगड आताची सर्वात मोठी बातमी येत आहे.  छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे.  बस्तर जिल्ह्यातील  नारायणपूरमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे-दारुगोळा जप्त करण्यात आली आहेत. आहे.  अजूनही चकमक सुरू असून आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बस्तर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, नारायणपूर-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवरील अभुजमाडच्या जंगलात दुपारी एकच्या सुमारास सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर गेले असताना चकमक सुरू झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर माड भागात नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नारायणपूर पोलिस आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी चकमक झाली आणि त्यात 24 नक्षलवादी ठार झाले. दंतेवाडाचे एसपी गौरव राय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दल सातत्याने कारवाई करत आहेत. ज्या नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे, त्यांनाही विशेष ऑपरेशन अंतर्गत परत येण्याची संधी दिली जात आहे. एवढे प्रयत्न करूनहीजे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांचा खात्मा केला जात आहे. विशेष म्हणजे, दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर प्रदेशात आतापर्यंत सुरक्षा दलांनी 181 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
वेगवेगळ्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group