मनमाड येथून जवळच असलेल्या पानेवाडी शिवारात दोन मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात एक मोटर सायकल स्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की मनमाड नांदगाव रोडवरील पानेवाडी जवळ नांदगाव वरून मनमाडच्या बुद्धलवाडी येथे जाणाऱ्या मोटार सायकल स्वार अनिल बबन सानप रा.बुद्धलवाडी या तरुण नांदगाव तालुक्यातील कासारी येथे असलेल्या आपल्या बहिणीला भेटून आपल्या राहत्या घरी मनमाडला जात असताना पानेवाडी जवळ समोरून येणाऱ्या मोटर सायकलची समोरासमोर धडक झाल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, एम.एच.४१,एन-३७९४ हे अनिल सानप हे नांदगांवकडून मनमाडकडे जात होते तर हे पानेवाडी येथील जावई विजय बाबुराव हेंबाडे हे पानेवाडीकडून आपल्या घरी शेतात मोटारसायकल क्रमांक एम.एच.४१-ए एल-६१७९ जात असताना अंधाराचा अंदाज न आल्याने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी पाहिलेल्या काही नागरिकांनी सांगितले.यांच्यात समोरासमोर भयानक धडक झाल्याने एकाचा जागेवर मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी जवळपास असलेल्या नागरिकांनी तातडीने धाव घेत याबाबतची माहिती पोलीस स्टेशन आणि पानेवाडीच्या रुग्णवाहिकेला कळविल्यानंतर रुग्णवाहिका तातडीने दाखल होऊन मयत आणि जखमींना घेऊन मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर अनिल सांगळे हे मयत झाल्याचे घोषित केले तर जखमी झालेल्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान मयत झालेले अनिल सांगळे यांचे वडिलांचे गेल्या काही महिन्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यातून ते सावरत नसतानाच आपल्या बहिणीला भेटून येताना त्यांच्यावर काळाने झडप घातले आहे त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने शहर परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.