आंध्र प्रदेशमधील अन्नामय्या जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला, अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. आंब्याचा ट्रक उलटल्यामुळे हा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर १२ जण जखमी झाले आहे.
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखळ करण्यात आले, तर ९ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
आंध्र प्रदेशातील अन्नामय्या जिल्ह्यातील रेड्डीचेरुवुजवळ रविवारी रात्री आंब्याने भरलेला एक ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. ट्रक राजमपेट मंडलातील थल्लापका गावाहून कोडूरला जात होता.
ट्रकवर आंब्याच्या पेट्यांवर मजूर बसले होते. रेड्डीपल्ली तलावाच्या बांधावर चढताना ट्रकचा मागचा चाक रेतीत अडकल्याने ट्रक पिकवरवर उलटला अन् अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांकडून अपघाताच्या कारणांची माहिती घेतली असून, जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी सूचना दिल्या आहेत.
पोलिसांची माहिती आणि तपास अन्नामय्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व्ही. विद्यासागर नायडू यांनी सांगितले, ट्रक डाव्या बाजूला उलटल्याने. आतमध्ये आंब्याच्या पेटीवर बसलेले मजूर खाली पडले. त्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला, तर १२ जखमी आहेत. अपघातामधील जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कडप्पा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुल्लमपेट पोलीस ठाण्यात बीएनएस आणि मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांनी चालकावर निष्काळजीचा आरोप केला आहे.