भीषण अपघात ! भरधाव कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना चिरडलं,एक महिलेचा मृत्यू,   कुठे घडली घटना ?
भीषण अपघात ! भरधाव कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना चिरडलं,एक महिलेचा मृत्यू, कुठे घडली घटना ?
img
नंदिनी मोरे
आजकाल अपघातांच्या प्रमाणामध्ये चिंताजनक वाढ होत आहे. दरदिवशी अनेक भीषण अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान आता बीड मधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगातील कंटेनरने आठ ते दहा वाहनांना धडक दिली, या अपघातामध्ये एक महिलेचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. ही घटना बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये घडली आहे. या घटनेनंतर जमाव चांगलाच संतप्त झाला, संतप्त जमावाकडून कंटेनरला आग लावण्यात आली आहे. या घटनेमध्ये कंटेनर जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या केज शहरामध्ये भरधाव वेगातील कंटेनर चालकाने तब्बल आठ ते दहा गाड्यांना धडक दिली. या अपघातामध्ये एक महिला ठार झाली असून,  15 जण जखमी झाल्याची माहिती आहे.  या अपघातामध्ये वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

कंटेनर चालकानं आठ ते दहा वाहनांना धडक दिली,  या अपघातानंतर कंटेनर चालकानं कंटेनरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. कंटेनर केजहून पुढे अंबाजोगाईकडे निघाला. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा कंटेनर ताब्यात घेतला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना धडक दिली, या अपघातामध्ये या वाहनांंचं प्रचंड नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका काशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र  भरधाव कंटेनरवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भरधाव कंटेनरनं आठ ते दहा वाहनांना उडवलं, या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे तसेच अनेक जण जखमी झाले, वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं. या घटनेनंतर संतप्त जमावानं या कंटेनेरला आग लावली, या घटनेत कंटेनर जळून खाक झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group